ताज्या घडामोडी

सिराज अरब लिखित / दिग्दर्शित ‘ दर्प ‘ या सस्पेन्स थ्रिलर मराठी चित्रपटाच्या संहितेचे पूजन..

निर्मात्याने दिग्दर्शक निवडताना त्याची योग्य पारख करून घेणे गरजेचे.सुरेश धोत्रे. अखिल भारतीय मराठी नाटय परिषद अध्यक्ष.

Spread the love

 पिंपरी येथे लेखक / दिग्दर्शक सिराज अरब लिखित / दिग्दर्शित ‘ दर्प ‘ या सस्पेन्स थ्रिलर मराठी चित्रपटाच्या संहितेचे पूजन भारदस्त कार्यक्रमाने संपन्न झाले.

आवाज न्यूज: पिंपरी, चिंचवड प्रतिनिधी, २२ ऑक्टोबर.

या अपूर्व सोहळ्यास अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष माननीय  भाऊसाहेब भोईर, मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अखील भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगांव दाभाडे शाखेचे अध्यक्ष . सुरेश धोत्रे, सुप्रसिध्द अभिनेत्री. पुष्पा चौधरी, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी नाट्य/चित्र तसेच कला क्षेत्रात भरीव कामगिरी करून अनेक उदयोन्मुख कलाकारांना संधी उपलब्ध करून देण्याचे मौलिक कार्य करणारे, तळेगांव दाभाडे येथील अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे अध्यक्ष, चित्रपट निर्माते, मा. नगराध्यक्ष. सुरेश धोत्रे यांना विशेष सत्काराने गौरविण्यात आले.

चित्रपट सृष्टी सर्वांचीच आहे, मराठी चित्रपटांना सध्या चांगले दिवस आले आहेत. फक्त निर्मात्याने दिग्दर्शक निवडताना त्याची योग्य पारख करून घेणे गरजेचे आहे. योग्य तयारी व अभ्यासांती या क्षेत्रात उतरल्यास, यशाला गवसणी घालणारे खूप सोपे आहे” असे सत्काराला उत्तर देताना. सुरेशजी धोत्रे यांनी मनोगत व्यक्त केले.

मोठ्या संख्येने जमलेल्या रसिकांमधून काही कलाप्रेमींचा सत्कारही या कार्यक्रमात करण्यात आला. दिवाळीच्या शुभेच्छांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia