आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*भीम महोत्सव २०२४ अन्तर्गत ‘भीम बाजार’चे मोठ्या थाटामाटात उदघाटन संपन्न*

Spread the love

सोलापूर- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त, भारतीय समाज सेवा संघ, सोलापूर या नोंदणीकृत संस्थेच्या वतीने आयोजित, पहिल्या भीम महोत्सवान्तर्गत ‘भीम बाजार’चे थाटात उद्घाटन झाले.


दोन दिवसीय भीम महोत्सव २०२४, ड्रीम पलेस, पोलिस कल्याण केंद, सेवासदन शाळेसमोर, सरस्वती चौक, सोलापूर येथे आयोजित केला असून, आज दि.१९.४.२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता, भंते सारीपुत्त यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन, ‘भीम बाजार’चे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मंचकावर संस्थापक अध्यक्ष जयकर ठोंबरे सर, यु.एफ़्.जानराव सर, शाहीर रमेश खाडे, कांबळे सर, डॉ. संभाजी मस्के, कृष्णा मेरगु, काडादी मॅडम, खरटमल मॅडम, लोंढे मॅडम, उबाळे मॅडम, पत्रकार संतोष क्षीरसागर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
दोन दिवस चालणाऱ्या या भीम बाजारात एकूण २५ व्यवसायिकांनी आपले स्टॉल सजविले आहेत.
यामध्ये विविध प्रकारच्या आकर्षक वस्तूंसह साड्या, ड्रेस मटेरिअल, कॉस्मेटिक दागिने, पुस्तके, खाद्य पदार्थ यांची रेलचेल असून, हस्तकलेच्या व चित्रकलेच्या जाणकारांची खास उपस्थिती आहे.


भंते सारीपुत्त यांच्या धम्मवाणीने व उपस्थित मान्यवरांच्या प्रेरक मार्गदर्शनाने, उत्साहवर्धक वातावरणात या भीम बाजारचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे संयोजकांनी आवाहन केले आहे….!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia