ताज्या घडामोडी

डोंगरगाव – कुसगाव पाणी पुरवठा योजनेचे महिलांच्या हस्ते भूमिपूजन

Spread the love

लोणावळा : डोंगरगाव- कुसगाव या भागातील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन स्थानिक महिलांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके उपस्थित होत्या.

या भागातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. महिलांची पायपीट थांबावी यासाठी आमदार सुनील शेळके यांनी जल जीवन मिशन अंतर्गत ६ कोटी ९० लाख ६२ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.

याव्यतिरिक्त आमदार शेळके यांच्या स्थानिक विकास निधी मधून डोंगरगाव येथील १ लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली आहे. यासाठी लागणारी जागा इंदुबाई गाडे, सीताबाई ठोंबरे , गंगाताई कोकरे, शंकर गाडे, अनंता गाडे यांनी विनामोबदला उपलब्ध करून दिली.

यावेळी कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता वैशाली आवटे, जिल्हा परिषद सदस्य कुसुम काशीकर, पंचायत समिती सदस्य राज्यश्री राऊत, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, लोणावळा शहराध्यक्ष मंजुश्री वाघ यांच्यासह आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia