ताज्या घडामोडी

माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

Spread the love

मावळ : मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार, हवेलीचे माजी आमदार गजानन बाबर यांचे आज (बुधवारी) निधन झाले. त्यांचे वय 79 होते.

बाबर मूळचे सातारा जिल्ह्यातील वाई येथील होते. पिंपरी- चिंचवड शहरात ते स्थायिक झाले होते. रेशन फेडरेशनचे अध्यक्ष होते. काळभोर भागातून ते पिंपरी-चिंचवड महापालिकेवर शिवसेनेच्या चिन्हावर नगरसेवक म्हणून निवडून आले. महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केले. तत्कालीन हवेली विधानसभा मतदारसंघाचे बाबर यांनी सलग दोन वेळा विधिमंडळात प्रतिनिधित्व केले. मावळ लोकसभा मतदारसंघाची 2009 मध्ये नव्याने निर्मिती झाली. शिवसेनेने बाबर यांना उमेदवारी दिली होती. बाबर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आझम पानसरे यांचा पराभव करत संसदेत प्रवेश केला.

बाबर यांची मोठी राजकीय कारकीर्द होती. मागील दीड महिन्यापासून ते आजारी होते. दोन दिवसांपूर्वी श्वास घेण्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांना बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.उपचारादरम्यान चारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले ,सुरज ,धीरज ,बंधू माजी नगरसेवक प्रकाश बाबर, मधुकर बाबर, तीन बहिणी, सुना ,नातवंडे असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia