ताज्या घडामोडी

कलापिनी बाल भवनच्या मुलांची होळी उत्साहात

होळी रे होळी पुरणाची पोळी..कचऱ्याच्या पोटात मारुया गोळी" अश्या आरोळ्यांनी कलापिनी बालभवन चा परिसर दुमदुमून गेला

Spread the love

तळेगाव : गेली २० वर्षे कलापिनी बालभवनची पर्यावरण पूरक होळी साजरी केली जाते.मुलांना आठवडाभर नको असलेले कागद,कचरा गोळा करायला सांगून ,त्याची होळी करण्यात येते.

सौ. मीरा कोंनुर यांनी मुलांना स्वछतेची,पर्यावरण विषयक माहिती देऊन होळीची गोष्ट सांगितली. मुलांबरोबर पालकही यात सहभागी झाले होते या कार्यक्रमाला कलापिनी संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. अंजली सहस्रबुद्धे उपस्थित होत्या.

श्री.रामचंद्र रानडे आणि श्री.विजय कुलकर्णी यांच्या हस्ते होळीची पूजा करण्यात आली.मुलांनी “जय भवानी जय शिवाजी” अश्या घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला. होळी साठी मोठ्या संख्येने पालक आणि इतर मंडळी उपस्थित होती.

बालभवन प्रमुख सौ.मधुवंती रानडे , सौ.अनघा बुरसे तसेच सर्व प्रशिक्षकांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.. मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला. पालकांनी कलापिनी बाल भवन असे विविध उपक्रम घेऊन मुलांना उत्तम संस्कार देते या बद्दल समाधान व्यक्त केले. पालकांनी कलापिनी बाल भवन असे विविध उपक्रम घेऊन मुलांवर उत्तम संस्कार देण्याचे बहुमोल कार्य करते या बद्दल समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia