ताज्या घडामोडी

कर्तुत्ववान महिलांचा सन्मान.

जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तळेगाव दाभाडे शहर गावविभागाच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना स्व.सुषमा स्वराज अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

Spread the love

कर्तुत्ववान महिलांचा सन्मान.Honoring the women of achievement. On the occasion of International Women’s Day, Bharatiya Janata Party Mahila Morcha, on behalf of Talegaon Dabhade City and Village Division, awarded Sushma Swaraj Award to women of achievement in various fields. 

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे, वार्ताहर २५ मार्च.

जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तळेगाव दाभाडे शहर गावविभागाच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना स्व.सुषमा स्वराज अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

 

अर्चना म्हाळसकर, प्रीती वैद्य, शिल्पा कशेळकर, रेणुका एकलंबे, निशा शेख यांना ‘स्व. सुषमा स्वराज अवॉर्ड’ च्या मानकरी ठरल्या.त्यांना तळेगाव दाभाडे शहर गाव विभागाच्या महिला मोर्चा अध्यक्षा मोहिनी भेगडे , कार्याध्यक्षा अश्विनी काकडे, सचिव रूपाली भेगडे, उपाध्यक्ष ज्योती वैद्य यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी राजमाता जिजाऊ महिला मंच मावळ तालुका संस्थापक अध्यक्षा सारिका बाळा भेगडे,
माजी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे,भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष रविंद्र माने, महिला मोर्चा स्टेशन विभाग अध्यक्षा तनुजा भेगडे, प्रसिद्धी प्रमुख मृदुला भावे, सरचिटणीस
स्मिता पोरे , वैशाली जामखेडकर आदी उपस्थित होते.
या सोहळ्यास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
सारिका भेगडे व मान्यवरांनी यास्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

 

स्वागत आणि प्रास्ताविक
महिला मोर्चा अध्यक्षा मोहिनी भेगडे यांनी केले. त्यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सुत्रसंचालन रूपाली भेगडे यांनी केले.अश्विनी काकडे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!