ताज्या घडामोडी

प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन जल्लोषात साजरा..

प्रथमेश साबळे व अनुश्री देशमुख यांनी मास्टर व मिस प्रतिभाचा बहुमान पटकाविला..

Spread the love

प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन जल्लोषात, प्रथमेश साबळे व अनुश्री देशमुख यांनी मास्टर व मिस प्रतिभाचा बहुमान पटकाविला

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी  ३० डिसेंबर.

चिंचवड येथील कमला शिक्षण संकुलाच्या प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोष -2022-23 प्रा.रामकृष्ण मोरे सभागृहात उत्साहात पार पडले. यामध्ये विद्यार्थ्यांनी कला, गायन, नृत्य अशा विविध कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
महाराषट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या सहाय्यक सचिव प्रिया शिंदे, क्रीडासंचालक क्रीडा युवा सेवा, पुणे विभागाचे महादेव कसगावडे, संस्थेच्या खजिनदार डॉ.भूपाली शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे. बी.एड. महाविद्यालयाच्या समन्वयिका डॉ. सुवर्णा गायकवाड, एम.बी.ए. चे संचालक डॉ. सचिन बोरगावे आणि सर्व प्राध्यापक, पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांनी भूषविले होते.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या महाराष्ट्र बोर्डाच्या सचिव प्रिया शिंदे या बोलताना म्हणाल्या महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या जास्त असूनही प्रत्येक वर्षी शम्भर टक्के निकाल लागतो हे कौतुकास्पद आहे.. पुढे त्यांनी बारावीच्या बोर्डा विषयीचे नियमांची माहिती विषद केली. विदयार्थ्यांनी प्रलोभने व सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नये असे आवाहन करून उपस्थित पालकांना सूचना करताना म्हणाल्या. मुलांचे हे वय चमकणारे आणि जीवनाला दिशा देणारेही आहे असे म्हणाल्या..विशेष अतिथी जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे व सध्याचे क्रीडासंचालक क्रीडा युवा सेवा, पुणे, महादेव कसगावडे यांनी विद्यार्थ्यांना क्रीडाक्षेत्राविषयी महत्व सांगत क्रीडाक्षेत्रातही मुलांना चांगली संधी असून क्रीडापट्टूना शासनाच्या नोकऱ्या सहज मिळू शकतात असेही सांगितले.
संस्थेचे संथापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी उपस्थित मान्यवरांनी केलेल्या बहुमोल मार्गदर्शन व सूचनांचे स्वागत करून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सदैव कार्यरत राहील, अशी ग्वाही यावेळी दिली.

प्रतिभा जल्लोषाच्या आठ दिवसांमध्ये सांस्कृतिक विभाग अंतर्गत सर्व शिक्षकांच्या सहकार्याने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. विदयार्थ्यांनी मेहंदी, फेस पेंटींग, टॅटू, नेल आर्ट, ब्रायडल मेकअप, पेपर किंग अँड क्वीन अशा स्पर्धा व होलोवीन डे, प्रोफेशनल डे, डेनिम डे,फन फेअर, व्हाईस ऑफ प्रतिभा अशा विविध गुणदर्शनच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन पारितोषिके मिळविली. तसेच ट्रॅडिशनल डे च्या माध्यमातून मास्टर अँड मिस प्रतिभा निवडण्यात आले. यामध्ये बेस्ट आऊट फिट मध्ये सृजन गोगटे व अनुष्का दहिभाते यांची निवड झाली तर मास्टर प्रतिभा अकरावीतील प्रथमेश साबळे याने व बारावीतील मिस प्रतिभा म्हणून अनुश्री देशमुख हिने मान मिळविला. कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिभा महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी महाविद्यालयाचे वार्षिक अहवालाचे वाचन केले. तसेच क्रीडा शिक्षिका व प्रा. शबाना शेख यांच्या मार्गदशनाखाली विविध पातळीवर खेळलेल्या क्रीडाक्षेत्रातील विजेत्या विद्यार्थ्यांच्या पारितोषिकेच्या यादींचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुकन्या बॅनर्जी यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. चिन्मयी जैन यांनी केले.
प्रतिभा जल्लोष हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. चिन्मयी जैन, प्रा.वर्षा निगडे, स्नेहा भाटिया, प्रा. राकेश कुंभार व सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia