ताज्या घडामोडी

लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासासाठी पास वितरणास सुरुवात

Spread the love

तळेगाव : मुंबईच्या धर्तीवर लसीचे दोन डोस घेऊन चौदा दिवस पूर्ण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना पुणे – लोणावळा लोकल प्रवासासाठी पास मिळण्यास सुरुवात झाली आहे.

तळेगाव व लोणावळा रेल्वे स्टेशनवरील तिकीट खिडकी जवळ नगरपरिषद व रेल्वेकडून नागरिकांना रेल्वे पास देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी रेल्वे स्टेशन वर मदत केंद्र उभी करण्यात आली आहेत.

ज्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांनी दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र व आधार कार्ड दाखवून मासिक पास घ्यावा असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोणावळा येथे दोन्ही रेल्वे स्थानकावर तिकीट घराच्या बाहेर रोज सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 4 ते 7:30 दरम्यान ही सुविधा उपलब्ध असेल तर, तळेगावमध्ये सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत मदत केंद्र सुरु राहील.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!