ताज्या घडामोडी

व्ही पी एस इंग्लिश टिचींग स्कूल,लोणावळा मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन साजरा.

विद्या प्रसारिणी सभेच्या लोणावळा येथील "व्ही पी एस इंग्लिश टीचींग स्कूल लोणावळा" येथे वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त पारितोषिक वितरण आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम साजरा करण्यात आला.

Spread the love

व्ही पी एस इंग्लिश टिचींग स्कूल,लोणावळा मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन साजरे.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, २१ डिसेंबर.

विद्या प्रसारिणी सभेच्या लोणावळा येथील “व्ही पी एस इंग्लिश टीचींग स्कूल लोणावळा” येथे वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त पारितोषिक वितरण आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून रामानंद शास्त्री चॅरिटेबल ट्रस्ट चे सेक्रेटरी .विजयकुमार कुकरेजा,राजेश गुप्ता,प्रसिद्ध अभिनेत्री अरुणा इराणी,अवतार कोहली,तसेच शाळा समिती अध्यक्ष .कन्हैय्या भुरट,सदस्य श्री.नितीन शहा,धीरूभाई टेलर कल्याणजी हे उपस्थित होते.या वेळी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले..कुकरेजा यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता आणि शिस्त याचे महत्व सांगितले.तसेच अभ्यासाबरोबर विविध खेळ,उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.

नियामक मंडळ अध्यक्ष डॉ. गो.व्यं. शिंगरे,कार्यवाह डॉ.सतीश गवळी,शाळा समिती व कार्यक्रमाचे अध्यक्ष. कन्हैया भुरट यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका. भारती लोखंडे,शिशुमंदिर च्या मुख्याध्यापिका.‌अन्नपूर्णा सुर्यवंशी,शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia