ताज्या घडामोडी

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत रायन क्लबच्या पाच संघांचा गटनिहाय विजय

Spread the love

तळेगाव दाभाडे : स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे तळेगाव दाभाडे येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत रायन क्लबच्या पाच संघांनी आठ पैकी पाच गटात विजयाची नोंद केली.

 

नूतन इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील १४ संघांनी भाग घेतला होता. येत्या डिसेंबर मध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली असल्याचे असोसिएशनचे सचिव विजय टेपगुडे आणि राष्ट्रीय खेळाडू मनोज स्वामी यांनी सांगितले.

यावेळी स्पोर्ट्सइंडीचे अधिकारी अमीन खान, ब्लुमिंग इंटरनॅशनल स्कुलचे विश्वस्त साहेबराव बोडके यांच्या हस्ते राष्ट्रीय पंच विजय कुमार चिनय्या, रोहित पाठक, मोहित पाठक, घनश्याम राणा, स्टँडली बर्फे, मतेश मुनय्यापन, अनिल सिंग, संतोष माळी यांचा सत्कार करण्यात आला.

 

प्राचार्य संजय क्षीरसागर व क्रीडा संचालक राजेंद्र लांडगे, क्रीडा सहाय्यक रवींद्र दाभाडे, ॲड. गणेश बाबर, ॲड. अविनाश कोयते, सीआरपीएफचे विजय कुमार नायर व अनिल सिंग यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय खेळाडू मनोज स्वामी यांनी विजेत्या संघाना राज्यस्पर्धेसाठी मार्गदर्शन केले व विजेत्यांचे अभिनंदन केले.

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचा निकाल याप्रमाणे:-

स्पर्धक १७ वर्षाखालील मुले
रायन फुटबॉल अकॅडमी अ प्रथम
रायन फुटबॉल अकॅडमी ब द्वितीय

स्पर्धक १७ वर्षाखालील मुली
रायन फुटबॉल अकॅडमी अ प्रथम
रायन फुटबॉल अकॅडमी ब द्वितीय

स्पर्धक १४ वर्षाखालील
रायन फुटबॉल अकॅडमी अ प्रथम
रायन फुटबॉल अकॅडमी ब द्वितीय
नोवेल इंटरनॅशनल स्कुल, चिंचवड तृतीय

स्पर्धक १२ वर्षाखालील
इंद्रायणी स्पोर्ट्स क्लब, भोसरी प्रथम
नोवेल इंटरनॅशनल स्कुल, चिंचवड द्वितीय
रायन फुटबॉल अकॅडमी अ तृतीय

स्पर्धक १० वर्षाखालील
इंद्रायणी स्पोर्ट्स क्लब, भोसरी प्रथम
नोवेल इंटरनॅशनल स्कुल, चिंचवड द्वितीय
रायन फुटबॉल अकॅडमी अ तृतीय

स्पर्धक ८ वर्षाखालील
रायन फुटबॉल अकॅडमी अ प्रथम
रायन फुटबॉल अकॅडमी ब द्वितीय

यामध्ये ६ वर्षाखालील
नोवेल इंटरनॅशनल स्कुल चिंचवड प्रथम
रायन फुटबॉल अकॅडमी ब द्वितीय
रायन फुटबॉल अकॅडमी अ तृतीय

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia