ताज्या घडामोडी

मराठी भाषेला मिळणार अभिमत भाषेचा दर्जा

केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांची संसदेत माहिती

Spread the love

नवी दिल्ली : देशाला मराठी भाषा व साहित्याचा सार्थ अभिमान आहे. या भाषेला अभिमत भाषेचा दर्जा देण्याचे काम सरकारकडून होत असून लवकरच मराठीला अभिमत भाषेचा दर्जा देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी आज संसदेत दिली.

राज्यसभेत प्रश्नकाल सत्रात बोलताना मेघवाल म्हणाले की, महाराष्ट्र शासनाचा प्रस्ताव सांस्कृतिक मंत्रालयाकडून भाषा तज्ञांच्या समितीकडे पाठविण्यात आला. साहित्य अकादमीकडे समितीने अहवाल सोपवला. तेथे काही त्रुटींची पूर्तता झाली आहे.हा प्रस्ताव आंतर मंत्रालयीन स्तरावर विचाराधीन आहे. केंद्रीय गृह मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय व शिक्षण मंत्रालयांतर्गत सध्या मराठी भाषेला अभिमत भाषेचा दर्जा देण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia