ताज्या घडामोडी

हातगाडे व लहान व्यावसायिकांकडून होत असलेली बेकायदेशीर बाजार वसुली थांबवण्याची मागणी

अंबाजोगाई भरारी न्युज : शहरातील हातगाडेधारक व लहान व्यावसायिकांकडून होत असलेल्या कथित बेकायदेशीर बाजार वसुलीविरोधात जनशक्ती पक्ष महाराष्ट्र राज्य दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने नगर परिषद प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात सदर वसुली तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनेचे प्रतिनिधी अशोक गंगाधर गंडले यांनी नगर परिषद अंबाजोगाईचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, नगर परिषद क्षेत्रात होणाऱ्या तात्पुरत्या बाजार वसुलीच्या नावाखाली काही ठेकेदारांकडून लहान व मोठ्या व्यावसायिकांकडून दररोज ४० रुपये, ३० रुपये व २० रुपये या प्रमाणे रक्कम वसूल केली जात आहे. मात्र सदर वसुली अधिकृतपणे सुरू आहे की बंद आहे, याबाबतची स्पष्ट माहिती सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवेदनात पुढे असा आरोप करण्यात आला आहे की, काही जणांकडून बेकायदेशीर पद्धतीने पैसे उकळले जात असून त्यामुळे सामान्य व्यावसायिकांची आर्थिक लूट होत आहे. या प्रकारामुळे हातगाडेधारक व लहान उद्योजकांमध्ये नाराजी पसरली असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून ही वसुली थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, जर ही वसुली तात्काळ बंद करण्यात आली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही अशोक गंडले यांनी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात, अशी विनंती प्रशासनाकडे करण्यात आली आहे

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia