ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवारांना बोलण्याची संधी का? दिली गेली नाही याविषयी देहू संस्थानाबद्दल नाराजी.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता भाषणासाठी व्यासपीठावर इशारा.

Spread the love

  आवाज न्यूज देहु:महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवारांना बोलण्याची संधी का? दिली गेली नाही याविषयी देहू संस्थानाबद्दल नाराजी व्यक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता भाषणासाठी व्यासपीठावर इशारा,राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात असे सांगितले की. जवळपास ३५० किमी पालखी मार्गाचा आपल्या भाषणात विस्तार करणार आहे सांगितले.वारकरी संप्रदायाकडून याचे स्वागत करण्यात आले आहे.मात्र देहू संस्थांकडून देहू संस्थांचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली मात्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना यावेळी बोलण्याची संधी का? उपलब्ध करून दिली गेली नाही हे विशेष म्हणावे लागेल.

कारण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे इशारा करून त्यांना संधी द्यावी असे व्यासपीठावर दिसून आले.याविषयी देहू संस्थान काय भूमिका मांडणार याकडे सर्वसामान्य आणि वारकऱ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले असल्याने देहू संस्थान कडून खुलासा केला जावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia