ताज्या घडामोडी

कामशेत :-महर्षी कर्वे आश्रमशाळा कामशेत येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ७५ वा. स्वतंत्र दिन उत्साहात साजरा.

Spread the love

कामशेत :-महर्षी कर्वे आश्रमशाळा कामशेत येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ७५ वा. स्वतंत्र दिन उत्साहात साजरा.


आवाज न्यूज : शिवानंद कांबळे,कामशेत प्रतिनिधी, 18 ऑगष्ट. 

महर्षी कर्वे आश्रम शाळा कामशेत येथे अमृत महोत्सवी ७५ व्या स्वतंत्र दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्रीकृष्ण घुले साहेब, असिस्टंट कमांडर ,सी. आर.पी. फ तळेगाव यांच्या शुभहस्ते, भारत माता पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमास शाळा समिती सदस्य धनंजय वाडेकर, विक्रम बाफना, ग्रामस्थ शंकर पिंगळे, माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर काजळे, पालक, आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता देवरे, पंढरीनाथ वाडेकर, श्रीकांत बुरांडे, तुकाराम पवार, उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदा विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी भारतातील एकात्मता विविध राज्य विविध भाषा विविध वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यानंतर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध कलागुण यामध्ये अंकिता निसाळ, जयश्री जाहिरे, काजल दाते या विद्यार्थिनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले विचार मांडले. इयत्ता नववी व दहावी च्या विद्यार्थिनींनी आदिवासी जीवनशैली वर आधारित एक आदिवासी संस्कृतीचे गीत बसून व त्याचे प्रत्यक्ष त्या गीतामधून दाखवण्याचा प्रयत्न केला.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, पंढरीनाथ वाडेकर प्रास्ताविक  तुकाराम पवार पाहुण्यांचा परिचय, दत्ता जाधव यांनी करून दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia