आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
आजार होऊ नयेत म्हणून आजारापूर्वीच आरोग्य तपासणी आवश्यक -प्रा.ईश्वर मुंडे
किल्ले घारूर तालुक्यातील आसरडोह येथील भुमीपुत्र डॅा.आशोक देवनाजी रूपनर यांच्या पुढाकाराने विभा मेडीकेअर हॅास्पीटल,लातूर व मोरया क्लिनीक लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आसरडोह येथे मोफत आरोग्य निदान शिबीर व विना मूल्य औषधोपचार शिबिरास उपस्थित राहून उद्घाटन व मार्गदर्शन करताना प्रा.ईश्वर मुंडे बोलत होते. पुढे प्रा.ईश्वर मुंडे म्हणाले की, आपल्या देशात चारशे लोकसंख्येला एक असे डॅाक्टरांचे प्रमाण आहे तर पाश्चात्य देशात चाळीस लोकसंख्येला एक डॅाक्टर असे प्रमाण आहे.जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी भारतात आनखी दहा पट डॅाक्टरांची संख्या व सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. या वेळी रमेशराव आडसकर म्हणाले की,ग्रामीण भागात आरोग्याची माहीती व उपचार मिळणे आवश्यक आहेत.माणूस हसून खेळून राहीला तर मानसिक आरोग्य चांगले राहून आजार मुक्त राहतो. तसेच माधवतात्या निर्मळ म्हणाले की, कोणत्या ही आजारावर वेळेवर उपचार मिळाले तर आजार समूळ नष्ट होतो. कार्यक्रमास शिवाजी काळे, सरपंच रविकांत देशमुख,भगवान पाटोळे, गोविंद शिंदे,भारत पिंगळे,गणेश पिंगळे,बाबुराव काचगुंडे,इतर मान्यवर उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक डॅा.आशोक रूपनर यांनी केले.डॅा.हंसराज कांबळे,डॅा.पुजा मुक्ता,डॅा.महेश पटाईत यांनी शिबीर,उपचार व योजनांची माहीती दिली.तर सुत्र संचालन महेश पिंगळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोविंद शिंदे,रमेश काजगुंडे,बाजीराव गडदे,यांनी सहकार्य केले. या शिबीरात तीनशे रूग्णांची तपासणी करण्यात आली असून या मध्ये बी.पी,शुगर,मनक्याचे आजार व त्वचारोग यांचे जास्त प्रमाण आढळून आले. या रूग्णांना मोफत औषधोपचार देवून पुढील उपचार,शासकीय योजनांची व आरोग्याची काळजी घेणे बाबतचे मार्गदर्शन करण्यात आहे.




