ताज्या घडामोडी

तळेगाव दाभाडे रोटरी सिटी तर्फे सायक्लोथोन (जॉय राइड) फेरीचे आयोजन.

रोटरी सिटी सायक्लोथोन (जॉय राईड) रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7:30 वाजता मारुती मंदीर चौक तळेगाव दाभाडे येथे आयोजित करण्यात आली आहे.

Spread the love

तळेगाव दाभाडे रोटरी सिटी तर्फे सायक्लोथोन (जॉय राइड) फेरीचे आयोजन.

 

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ८ जानेवारी.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी रोटरेक्ट तळेगाव दाभाडे सिटी व इंडो ॲथलेटिक सोसायटी यांच्यावतीने व वास्तू डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी सिटी सायक्लोथोन (जॉय राईड) रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7:30 वाजता मारुती मंदीर चौक तळेगाव दाभाडे येथे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मा आमदार नितेश राणे,माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या शुभहस्ते व रोटरीचे डिस्टिक गव्हर्नर रो अनिलजी परमार व डी आर आर डिस्ट्रिक्ट 3131 ॲडव्होकेट आकाश चिकाटे त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे.

तरी तळेगाव शहरातील व मावळ पंचक्रोशी मधील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या जॉयराइडमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन रोटरी सिटी चे अध्यक्ष रो दीपक फल्ले यांनी केले आहे.या जॉयराईड मध्ये तीन सायकली लकी ड्रॉ मध्ये ठेवण्यात आल्या आहेत तर उत्कृष्ट निसर्ग सायकल सजावट स्पर्धेसाठी तीन सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे अशी माहिती प्रकल्प प्रमुख रो. संतोष परदेशी व हर्षद जव्हेरी यांनी दिली.

या सायकल फेरीचा बक्षीस वितरण समारंभ सायकल फेरीनंतर लगेचच त्याच ठिकाणी सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती सहप्रकल्प प्रमुख रो संतोष शेळके व तळेगाव दाभाडे सिटी रोटरेक्टचे अध्यक्ष वैभव तनपुरे यांनी दिली.संपूर्ण सायकल फेरीचे नियोजन इंडो ऍथलेटिक सोसायटीचे  गजानन खैरे, अजित पाटील व  गणेश भुजबळ हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!