ताज्या घडामोडी

दादरच्या शिवाजी पार्क मैदानात सापडल्या गोड्या पाण्याच्या विहिरी

Spread the love

आवाज न्यूज : समुद्रापासून अवघ्या काही पावलांवर असलेल्या दादरच्या शिवाजी पार्क  मैदानात गोड्या पाण्याचे स्त्रोत सापडले आहेत. शिवाजी पार्क मैदानाच्या नूतनीकरणाचा प्रकल्प लवकरच सुरु होणार आहे. त्याआधी इथे ३५ विहिरी खोदण्यात (wells found) आल्या. त्यात पाच विहिरींमध्ये गोडे पाणी लागले आहे. खरंतर समुद्राच्या अत्यंत जवळ असलेल्या या मैदानात गोडं पाणी लागणं एक वेगळी गोष्ट आहे.

“माहिमपासून वरळीपर्यंत आणि समुद्रापासून सावरकर मार्गापर्यंत वालूकामय भाग आहे. इथे गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. ओशियाना अपार्टमेन्ट, मधुवती, कोहिनूर स्कवेअर इथे गोड्या पाण्याच्या विहिरी होत्या. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानातही गोड्या पाण्याची विहिर लागणार याची खात्री होती” असे भूगर्भशास्त्रज्ञांनी सांगितले.

आजच्या घडली प्रत्येक विहिरीत १.५० लाख लिटर पाणी आहे, असे भूगर्भ शास्त्रज्ञांनी सांगितले. शिवाजी पार्क मैदानात क्रिकेट खेळलं जातं. अनेक क्रीडा प्रकार इथे शिकवले जातात. दरम्यान मधल्याकाळात या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना धुळीचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता. टीबीचे रुग्णही या भागात वाढले होते. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानाच्या नूतनीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला. शिवाजी पार्क मैदान अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक जीवनात या मैदानाचे एक वेगळे महत्त्व आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!