ताज्या घडामोडी

दोस्ती एक अफसाना है याद आये तो अपना है – भूल जाये तो सपना है!

मग या मैत्री संदर्भात आपण अधिक जाणून घेऊया-

Spread the love

दोस्ती एक अफसाना है याद आये तो अपना है – भूल जाये तो सपना है!Dosti ek afsana hai yaad aye to apna hai – bhul jaye to sapna hai!

आवाज न्यूज : विशेष लेख, मावळ, ४ मार्च..

मग या मैत्री संदर्भात आपण अधिक जाणून घेऊया-मदर इंडिया नावाच्या सिनेमात एक अतिशय सुरेख गाजलेलं गीत होतं ते असं दुनिया मे अगर हम आये है तो जीना ही पडेगा जीवन अगर जहर है तो पि नाही पडेगा जवळजवळ साठ वर्षांपूर्वी या गीताच्या बोलातून आपल्या जीवनाशी निगडीत असं कटू सत्य सांगण्यात आलं होतं तसंच या जीवन प्रवासात मित्र आणि शत्रू दोन व्यक्तींना आपण टाळू शकत नाही .

मग प्रश्न येतो यातील खरा मित्र कोण आणि शत्रू कोण हे कस ओळखायच मित्राची व्याख्या अतिशय सोपी आहे की जो मित्र आपल्या नेहमी सुखदुःखात सामील होतो कुठल्याही परिस्थितीत आपली साथ-संगत सोडत नाही हा आपला खरा मित्र ओळखायचा एक कानमंत्र आपल्याजवळ आहे आपल्याला दोन प्रकारचे शत्रू असतात एक जो प्रत्यक्ष व्यक्तीच्या रूपात आपल्यासमोर येतो तो आणि दुसरा परिस्थिती निर्माण करून आपल्याला दुःखाच्या खाईत लोटतो तो एक आपला छुपा शत्रु असतो की जो कधीच आपल्याला टाळता येत नाही पण मित्रांनो त्याची सुद्धा आपल्याला जीवनात अत्यंत आवश्यकता असते त्याशिवाय आपले पाय जमिनीवर आणि श्रद्धा परमेश्वर वर राहू शकत नाही.

नाहीतर प्रत्येक माणूस यश मिळाल्यानंतर सत्ता संपत्ती समृद्धी सन्मान मिळाल्यानंतर बे बंद झाला असता उन्मत्त झाला असता त्यासाठी हा शत्रूसुद्धा आपल्या वागण्या बोलण्या वर अवश्य अशी वेसण घालणारा अत्यंत आवश्यक असलेला शत्रू आहे हे असं विधान आहे मित्रांनो आता प्रत्यक्ष शत्रू कसा ओळखायचा हे आपण पाहूया जो समोरासमोर आपली निंदा करतो आपला आत्मविश्वास डळमळीत करतो आपल्या नेहमी दोष म्हणून गुणांवर सुद्धा बोट ठेवून मनाला वेदना देतो तो खरा शत्रू असतो म्हणून म्हटलं जातं की एखाद्या लबाड मित्रापेक्षा दिलदार शत्रू असावा आणि शत्रू जेवढा उमदा ताकद वर तेवढच आपल व्यक्तिमत्व सक्षम कणखर आणि आत्मविश्वास संवर्धन करणारा घटक आहे उदाहरणच द्यायचं म्हणजे आज जगातील सर्वात मोठा मानव जातीचा शत्रू म्हणजे कोरोनाव्हायरस यांच्याशी लढण्यासाठी आपण सर्व ताकदीनिशी रणांगणात उतरलो आहोत आणि आपल्या सर्वांची वाटचाल हळूहळू यशाकडे चालली आहे युरोप आणि अमेरिकासारख्या जगाला नेतृत्व देणाऱ्या राष्ट्रांना सुद्धा ज्याने नामोहरम केलेल आहे हे कटू सत्य प्रत्यक्ष याची देही याची डोळा आपण पाहत आहोत.

 

मित्रांनो जेवढा बलाढ्य आणि मातब्बर विलन असेल तर अशी लढाई लढण्यात खरा पुरुषार्थ आहे म्हणून शत्रूला कधीही कमी लेखू नये तो आपल्या व्यक्तिमत्वास सक्षम करण्यास आवश्यक असतो हाच विचार आपल्या मनात रुजला असेल म्हणून येथेच थांबतो  लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी ..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!