ताज्या घडामोडी
सार्वजनिक गणेशोत्सवा निमित्त श्री गणेश तरूण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न…
आवाज न्यूज :श्री गणेश तरूण मंडळ ( मानाचा पाचवा गणपती ) गणपती चौक तळेगांव दाभाडे , श्री बालाजी मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व मंडळाचे आधारस्तंभ स्व श्री विनोदभाई मेहता यांच्या स्मरणार्थ
आज रविवार दि १२ सप्टेंबर २०२१ रोजी प्रतिवर्षाप्रमाणे रक्तदान शिबिर संपन्न झाले.
मंडळाच्या वतीने या वर्षी श्रींच्या चरणी आरोग्य उत्सवाचा संकल्प सोडला आहे. या अंतर्गत आज रक्तदान शिबिरात ५० इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शासनाच्या आवाहनानुसार व सध्याच्या कोविड काळातील रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने मंडळाच्या वतीने उपक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष श्री महेश सोनपावले , श्री बालाजी मंदिर ट्रस्टचे सदस्य श्री प्रतिक मेहता यांनी केले. आधार रक्तपेढी धनकवडी पुणे अंतर्गत संकलन करण्यात आले.






