ताज्या घडामोडी

रंगपंचमीनिमित्त भुशीगाव टाटातलावातील  श्री. कानिफनाथ मठ मंदिरात भाविकांकडून दर्शनास रांगा.

Spread the love

रंगपंचमीनिमित्त भुशीगाव टाटातलावातील  श्री. कानिफनाथ मठ मंदिरात भाविकांकडून दर्शनास रांगा.On the occasion of Rangpanchami, Shri. Devotees line up for darshan at the Kanifnath Math temple.

आवाज न्यूज ; लोणावळा प्रतिनिधी, १४ मार्च.

रंगपंचमीनिमित्त भुशीगाव टाटातलावातील श्री. कानिफनाथ मठ मंदिरात दर्शनास रांगा लागलेल्या पहायला मिळाल्या . लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांनी रांगा लावून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.

 

श्री कानिफनाथ मिञ मंडळ , मठ मंदिरात , टाटा तलाव भुशी येथे भाविकांकडून मोठ्या संख्येने दर्शनास गर्दी उसळली होती.येथे श्री कानिफनाथ मिञ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मोतीराम मराठे , नगरसेवक व सर्व विश्वस्थांतर्फे येथे मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई , व फुलांची सजावट करण्यात आली होती.येथे गावठाण येथून श्री कानिफनाथ महाराजांची पालखी ढोलताशांच्या गजरात मठामधे वाजत गाजतअध्यक्ष सोमनाथ बोभाटे यांचे नेतृत्वाखाली आणण्यात आली.खोपोलीतील ढोलताशांच्या पथकाने या पालखीला शोभा आणली .येथे मुळशीमधील  भजनी मंडळांच्यावतीने भजनाचा सुरेख कार्यक्रम झाला.

 

येथील झाडांवर , तसेच मठाचे परिसरात आकर्षक सजावट केल्याने व सुमारे पंचवीस तीस हजार भाविकांकडून दर्शनासाठी गर्दी केल्यामुळे परिसरात चैतन्य आले.
येथे भुशी तलावामधे गावठाण येथील श्री भैरवनाथ उत्सवानिमित्त आयोजित भव्यदिव्य बैलगाडा शर्यती ( छकडी ) असल्याने श्री कानिफा मुरारी चे दर्शनास व बैलगाडा शर्यतीस आलेल्या भाविकांकडून दुप्पट संख्येने वाढ झाल्याने टाटा तलाव माणसांनी व मोटारसायकल , जीप , टेम्पो , कार , बैलगाडीने भरून गेला होता..
लोणावळा शहरचे पोलिसांकडून येथे पोलिस नाईक वाणी व सहकारी यांचेकडून चोख पोलिस बंदोबस्तामुळे कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!