ताज्या घडामोडी

भारतीय कुस्ती महासंघातर्फेनेमलेल्या अस्थायी समितीच्या मान्यतेने संस्कृती प्रतिष्ठान व माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६५ व्या वरिष्ठ गट (गादी व माती) राज्यस्तरीय अजिंक्यपद निवडचाचणी स्पर्धेचे आयोजन..

या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी गटात माती विभागातून खालकर तालीमच्या पृथ्वीराज मोहोळने तर गादी विभागातून हर्षद कोकाटेने बाजी मारली..

Spread the love

भारतीय कुस्ती महासंघातर्फे नेमलेल्या अस्थायी समितीच्या मान्यतेने संस्कृती प्रतिष्ठान व माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६५ व्या वरिष्ठ गट (गादी व माती) राज्यस्तरीय अजिंक्यपद निवडचाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, २८ नोव्हेंबर.

या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी गटात माती विभागातून खालकर तालीमच्या पृथ्वीराज मोहोळने तर गादी विभागातून हर्षद कोकाटेने बाजी मारली आहे.राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी स्टेडियम, मंगळवार पेठ येथे करण्यात आले होते. ही निवड चाचणी स्पर्धा राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त अध्यक्ष स्व. वस्ताद दामोदर – लक्ष्मण टकले यांच्या स्मरणार्थ घेण्यात आली.

यावेळी संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष हिंदकेसरी योगेश दोडके, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, विश्वस्त तात्यासाहेब भिंताडे, सरचिटणीस शिवाजीराव बुचडे, नगरसेवक महेंद्र पाठारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तमराव तांगडे, स्पर्धा आयोजक अविनाश टकले, कार्यकारिणी सदस्य जयसिंगराव पवार, मधुकर फडतरे, गणेश दांगट, योगेश पवार, हेमेंन्द्र किराड, सुभाष पोकळे, शामराव यादव, रवी खालकर, संभाजी आंग्रे, विकास दगड, सुनील भाऊ देवकर, शरद पवार, रामदास माझिरे, सोमनाथ मोझे हे मान्यवर उपस्थित होते.
सदर स्पर्धेसाठी मोहन खोपडे, चंद्रकांत मोहोळ, विठ्ठल मोहोळ, तुषार गोळे, नीलेश मारणे, रोहिदास आमरे, पप्पू कालेकर व विक्रम पवळे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

स्पर्धेचे अंतिम निकाल पुढील प्रमाणे.

गादी विभाग

५७ किलो : विजय मोझर ( जायनाथ तालीम), मयूर दाखटकर (हनुमान आखाडा)

६१ किलो : अभिजित शेडगे ( मामासाहेब मोहोळ), भालचंद्र कुंभार (हनुमान आखाडा)

६५ किलो : विपुल थोरात (सह्याद्री संकुल), उदयसिंह मोरे (मामासाहेब मोहोळ)

७० किलो : संकेत ठाकूर (सह्याद्री संकुल), करण फुलमाळी (हनुमान आखाडा)

Professional Indian Wrestler showing off muscles

७४ किलो : शुभम थोरात (शिवरामदादा तालीम), – —

७९ किलो : अक्षय ढगे (मामासाहेब मोहोळ), गणेश खडके (आंतरराष्ट्रीय संकुल)
[11/28, 22:53] Gopal Pardeshi: ८६ किलो : ओंकार दगडे (हनुमान आखाडा),

आदित्य कुंजीर (मुकुंद व्यायामशाळा) ९२ किलो : तुषार तांगडे (आंतरराष्ट्रीय संकुल), अनिकेत कंधारे (हनुमान आखाडा)

९७ किलो : नीलेश केदारी (हनुमान आखाडा), अथर्व चव्हाण (शिरामदादा तालीम)

८६ ते १२५ किलो महाराष्ट्र केसरी गट : हर्षद कोकाटे (हनुमान आखाडा), ऋतिक पायगुडे (हनुमान आखाडा)

माती विभाग :

५७ किलो : श्रीकृष्ण राऊत (हनुमान आखाडा), जय कदम (कुंजीर तालीम)

६१ किलो : सचिन दाताळ (मामासाहेब मोहोळ), साहिल माथवड (नगरकर तालीम)

६५ किलो : अनुदान चव्हाण (आंतरराष्ट्रीय संकुल), भूषण कासुर्डे (गुलसे तालीम)

७० किलो : निखिल कदम (शिवरामदादा तालीम), प्रीतम

घोरपडे (सिंहगड कुस्ती केंद्र) ७४ किलो : आकाश दुबे (शिवरामदादा तालीम), प्रितेश वाघमारे (हनुमान आखाडा)

७९ किलो : शुभम शेंडे (हनुमान आखाडा)

८६ किलो : अमित गायकवाड (गोकुळ वस्ताद तालीम), अतुल पानसरे (आंतरराष्ट्रीय संकुल)

९२ किलो : चेतन राक्षे (सह्याद्री क्रीडा संकुल), लौकिक सुर्वे (हनुमान आखाडा)

९७ किलो : संभाजी आटोळे (हनुमान आखाडा), अक्षय मांगडे (लोणी काळभोर)

८६ ते १२५ किलो महाराष्ट्र केसरी गट : पृथ्वीराज मोहोळ (खालकर तालीम), किसान कोकाटे (हनुमान आखाडा)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!