ताज्या घडामोडी

वेहेरगावातील तीन शेतक-यांचे भाताचे पेंढा असलेली उढवी आगीत भस्मसात ! टँकर आणून आग विझविल्याने मोठी हानी टळली.

नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली....

Spread the love

वेहेरगावातील तीन शेतक-यांचे भाताचे पेंढा असालेली उढवी आगीत भस्मसात ! टँकर आणून आग विझविल्याने मोठी हानी टळली.

आवाज न्यूज  : लोणावळा  प्रतिनिधी ता.६ जानेवारी.

वेहेरगावातील तीन शेतक-यांचे भाताचे पेंढा असलेली उढवी आगीत भस्मसात झाली . ग्रामस्थांतर्फे तात्काळ राञीच्या वेळी घडलेल्या या आकस्मित आगीच्या घटनेबाबत माहिती मिळताच टँकर आणून आग विझविल्याने मोठी हानी टळली.
प्रगतीशील शेतकरी दत्ताञेय रघुनाथ बोञे , रा वेहेरगाव , यांचे ३५० भाताचे भारे झोडून रचलेल्या पेंढ्यांचे ४२०० पेंढ्यांचे उढवे आगीत जळून खाक झाले.

सुमारे पंचवीस हजाराचे नुकसान झाल्याचे दत्ताञेय बोञे म्हणाले.यावेळी त्यांचे बंधू सोपान रघुनाथ बोञे ,( रा वेहेरगाव ) यांचे १५० भारे झोडलेले सुमारे १५००पेंढ्यांचे उढवे जळून खाक झाले ,त्यांचे सहा हजार ते आठ हजार रूपयांचे नुकसान झाले, असे सोपानराव बोञे यांच्यातर्फे सांगण्यात आले.

जवळच असलेल्या येथील प्रगतीशील शेतकरी भाऊ तुकाराम बोञे (, रा -वेहेरगाव ) यांचे भाताच्या १५०० हजार पेंढ्या , आणि एक हजार गवताच्या पेंढ्या असलेली गंज अज्ञात इसमाने आग लावल्यामुळे पेंढ्या जळून सुमारे १५ ते २० हजाराचे नुकसान झाले , या आगीच्या घटनेमुळे गायी , बैल , म्हैस यांचे हाल होणार आहेत.त्यांच्या नुकसानीचे तलाठी कार्यालय व पोलिसपाटील यांनी पंचनामा करावा..येथील आगीच्या घटनेबाबत तसेच लोणावळा ग्रामिण पोलिसांकडून दखल घेण्यात यावी , असे या शेतकऱ्यांनी सांगितले.

यावेळी अनेक गावचे ग्रामस्थ , तसेच शिलाटणे चे पोलिसपाटील.भानुसघरे आदी मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली..तसेच नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!