ताज्या घडामोडी

इंडियन स्काउट अँड गाईड फेलोशिप महाराष्ट्र स्टेट तर्फे सातारा पूरग्रस्तांना एक हाथ मदतीचा

Spread the love

लोणावळा : सातारा येथील मळे, कोळणे, पाथरपून्ज या गावाला पुरामुळे प्रचंड नुकसान झालं. संपर्क तुटला. त्यांच्या मदतीला इंडियन स्काऊट गाईड फेलोशिप महाराष्ट्र स्टेट धावून आली. 200 कुटुंबासाठी 15 दिवसाचं राशन किट,जीवनाश्यक वस्तू ( तांदूळ, तूरडाळ, साखर,चहापावडर, पोहे, रवा, तेल, साबण तीन प्रकारचे, मीठ, मसाले व बिस्कीट )आणि शाळेत वापरण्यासाठी आकर्षित स्कूल बॅग देण्यात आले.

यावेळी इंडियन स्काऊट गाईड फेलोशिप महाराष्ट्र स्टेटचे अध्यक्ष विष्णू अग्रवाल, राज्य सचिव डॉ अमोल कालेकर, लोणावळा गिल्ड चे अध्यक्ष डॉ अशोक घाडगे, उपाध्यक्ष रत्नप्रभा गायकवाड, सचिव सुनिल शिंदे, खजिनदार सुरेश गायकवाड, पत्रकार श्रावणी कामत, शशिकांत भोसले, आशिष जंlगीर, नंदिका कामत, फलटण गिल्ड च्या अध्यक्ष वासंती जाधव पत्रकार विद्या मसुरणेकर, सातारा भारत स्काऊट गाईड चे सुरेश चव्हाण, उमेश मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान व हानी झाली.असे सांगताना गावक-याचे डोळे पाणावले.पत्रकार विद्या व इंडियन स्काऊट गाईड फेलोशिप महाराष्ट्र स्टेटचे गावक-र्यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!