ताज्या घडामोडी

नाणे येथील रस्त्यावर पाणी साचल्याने सहा गावांचा संपर्क तुटला

Spread the love

कामशेत : येथे दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे.  पावसाच्या जोरदार हजेरीमुळे कामशेत मधील इंद्रायणी नदीला जवळपास पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. इंद्रायणी नदी जवळच्या स्मशानभूमी,  शेतात व नाणे मावळकडे जाणाऱ्या रस्त्यात पाणीच पाणी झाल्याने नाणे मावळ मधील तब्बल सहा गावांचा संपर्क तुटला आहे.कांब्रे, कोंडिवडे, उकसान, जांभवली या नाणे मावळातील गावांचा संपर्क तुटला आहे.

कामशेतमध्ये सोमवारपासून पावसाने जणू काही द्विशतकच केले आहे.पावसाच्या जोरदार हजेरीमुळे कामशेत शहर व आसपासच्या गावात विजेचा लपंडाव सुरु आहे. विजेचा लपंडाव सुरु असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!