ताज्या घडामोडी

धनगर ऐक्य परिषद मावळ यांच्या वतीने आमदार सुनिल शेळके यांना विविध मागण्यांसाठी निवेदन

Spread the love

तळेगाव : धनगर ऐक्य परिषद मावळ तालुका व धनगर समाजाच्या वतीने आमदार सुनिल  शेळके यांना समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज निवेदन देण्यात आले.

निवेदनातील मागण्या :

१. धनगर समाज आरक्षण अंमलबजवणीबाबत आपण सभाग्रहामधे प्रश्न उपस्थित करावा
२. जे आदिवासी समाजाला ते धनगर समाजाला अशा सर्व योजना व १००० कोटीचा निधी समाज विकासासाठी उपलब्ध करून द्यावा
३. मावळ तालुक्याचा इतिहास पाहता आपण आमदार निधीतून किंवा आपल्या सहकार्यातून अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक मावळ तालुक्यात उभारावे

यावेळी सदस्य धनगर ऐक्य परिषद पार्लमेंटरी बोर्ड संजय कोकरे , समन्वयक अमोल ठोंबरे , सरपंच बबनराव खरात, दत्ता कोकरे, उद्योजक दत्ता काळे , मा. सरपंच दत्ता आखाडे , अक्षय ठोंबरे, प्रनाल निंबाळकर, शेखर ठोंबरे,उपाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज,पुणे विजय सरक,  अध्यक्ष रासपा मावळ रामजी कोळेकर  व इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!