ताज्या घडामोडी

पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उभारण्यात येणार.व्यवस्थापीका इंदू राणी दुबे .

Spread the love

पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उभारण्यात येणार.व्यवस्थापीका इंदू राणी दुबे

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी . ५ डिसेंबर.

पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उभारण्यावर भर देण्यात येणार असल्याचा निर्धार पुणे रेल्वेच्या नव्या व्यवस्थापीका इंदू राणी दुबे यांनी व्यक्त केला.

स्थानकातील सर्व फलाटांची लांबी वाढविणे, स्थानकात पादचारी पुलाला जोडण्याच्या लिफ्ट बसविणे, सीसीटीव्ही यंत्रणेच्या जाळ्याच्या विस्तारासह पुणे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी विकसित करण्यात येत असलेल्या हडपसर • टर्मिनलबाबतही योजनात्मक पद्धतीने काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्याही वाढविण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितल.

इंदू राणी दुबे यांनी नुकताच पुणे रेल्वेच्या व्यवस्थापकदाचा कार्यभार स्वीकारला. शुक्रवारी (2 डिसेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुणे विभागाशी संबंधित विविध योजनांची माहिती दिली. दुबे म्हणाल्या, की पुणे स्थानकावरील दोन फलाटावरच सध्या 26 डब्यांच्या गाड्या उभ्या करता येऊ शकतात. पुढील काळात सर्वच फलाटांची लांबी वाढविण्यात येणार आहे. त्याबाबतची योजना तयार असून, लवकरच त्याबाबत काम सुरू करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!