ताज्या घडामोडी

नाट्य परिषद, त.दा. शाखा आणि नाट्यगृह उभारणी साठी सर्वतोपरी मदत करण्याचे मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन.

Spread the love

नाट्य परिषद, त.दा. शाखा आणि नाट्यगृह उभारणी साठी सर्वतोपरी मदत करण्याचे मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन.

आवाज न्यूज: मुंबई प्रतिनिधी २१ नोव्हेंबर.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची, तळेगाव दाभाडे शाखा आणि नगरपरिषदेचे प्रस्तावित सुसज्ज नाट्यगृह उभारणी साठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन महाराष्ट्राचे उद्योग मंत्री व महाराष्ट्र राज्य नाट्यपरिषद मुंबई विभागाचे विश्वस्त श्री. उदयजी सामंत यांनी दिले.

तळेगाव दाभाडे नाट्य परिषद शाखेचे संस्थापक अध्यक्ष व मा. नगराध्यक्ष. सुरेश धोत्रे यांनी दि. २० नोव्हेंबर रोजी आपल्या सहकाऱ्यांसह मंत्री उदय सामंत यांची मुंबई येथे भेट घेतली. त्यावेळी पुढील विस्तारबाबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी आश्वासन दिले.

नाट्य परिषद, तळेगाव शाखेची वाटचाल आणि नगरपरिषदेचे प्रस्तावित नाट्यगृह याविषयी सविस्तर चर्चेअंती नाट्यगृह उभारणी साठी सर्वतोपरी सहकार्य आणि नाट्य परिषदेच्या कार्यक्रमांसाठी उद्योग समूहाचा सीएसआर फंड उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!