ताज्या घडामोडी

वाय.सी.एम. रुग्णालयामध्ये व्यसनमुक्ती समुपदेशन कार्यशाळा..

वाय.सी.एम. रुग्णालयातील चाणक्य हॉल येथे वॉर्डबॉय व वर्ग चारच्या कर्मचारी वर्गासाठी विमल फौंडेशनच्या वतीने व्यसनमुक्ती समुपदेशन कार्यशाळा घेण्यात आली.

Spread the love

वाय.सी.एम. रुग्णालयामध्ये व्यसनमुक्ती समुपदेशन कार्यशाळा..

आवाज न्यूज : गुलामअली भालदार,  चिंचवड प्रतिनिधी, १५ ऑक्टोबर :

वाय.सी.एम. रुग्णालयातील चाणक्य होल येथे वॉर्ड बॉय व वर्ग चारच्या कर्मचारी वर्गासाठी विमल फौंडेशनच्या वतीने व्यसनमुक्ती समुपदेशन कार्यशाळा घेण्यात आली. यात दंत तज्ज्ञ डॉ मनिषा गरूड यांनी प्रत्यक्ष: चिञ फिती दाखवून तंबाखूचे दुष्परिणामांची माहिती दिली तंबाखू सेवन करणा-यांपैकी ५०% लोक हे मृत्यू मुखी पडतात. त्यांचे परिवार उघड्यावर येतात. अशा प्रकारे तंबाखू च्या दुष्परिणामांची माहिती दिली.

तसेच विमल फौंडेशनचे अध्यक्ष विल्यम साळवी यांनी व्यसनमुक्ती कशा पध्दतीने शक्य आहे याची शास्त्रीय माहिती दिली, न कळत माणसांकडून आपल्या तणावाचे नियोजन हे अंमली पदार्थांचे सेवन करून केलं जातं. जे पुढे त्यांच्या जिवावर बेतते. वाय. सी.एम.आधिष्ठाता मा. डॉ राजेंद्र वाबळे म्हणाले वाय.सी.एम. रुग्णालयाकडे सर्व सामान्यांचा दृष्टीकोण हा बदलला पाहिजे आशा पध्दतीने कर्मचारी स्वतः   निर्व्यसनी राहुन येणाऱ्या नातेवाईक ही रुग्णालयात व्यसन करण्यापासून रोखले पाहिजे.

रुग्णालय अंमली पदार्थ मुक्त व स्वच्छ ठेवण्याचे आव्हान केले. कार्यक्रमाच्य शेवटी उपस्थित सर्व शंभर हुन अधिक कर्मचाऱ्यांनी तंबाखू न सेवन करण्याची शपथ घेतली.

कार्यक्रमाचे सुञसंचालन आर.बी.पाटील यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आयोजन बी.व्ही.जी कंपनी चे विभाग सिनियर मेनेजर गणेश कासार यांनी केले. व्यसनमुक्ती कार्यशाळा पुढे ही अशीच चालू ठेवून वायसीएम रुग्णालय अंमली पदार्थ मुक्त व स्वच्छ ठेवण्याचे प्रयत्न होत राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!