आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*आजी -आजोबांचा  नातवाचा कायमचा ताबा मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल* – *अँड. श्रीनिवास कटकुर ( विधिज्ञ)*

Spread the love

सोलापुर :- शहराचे उच्चभ्रु भागात राहणारे आजी आजोबा प्रतितयश उद्योगपती श्री रामेश्वर वय 65 वर्ष आणि सौ.महालक्ष्मी वय 60 वर्ष या आजी – आजोबाने नातू कु. अश्वथ वय 9 वर्ष याचा कायमचा ताबा मिळण्यासाठी सुने विरुद्ध ऍडव्होकेट श्रीनिवास कटकुर यांच्यामार्फत सोलापूर येथील मेहरबान. कौटुंबिक न्यायालयात परमनंट चाईल्ड कस्टडीचा ( Permanant Child Custody )चा दावा दाखल केलेला आहे*.

*यात केसची हकीकत अशी की*
उद्योगपती आजी-आजोबांचे मोठा उद्योगधंदा असून त्यांचा मुलगा कै. मंगेश यांचा सून सौ अवनी यांच्यासोबत दहा वर्षांपूर्वी सोलापुर येथे विवाह झालेला होता व सदर लग्नातुन नातु . कु. अश्वथ (सध्पा वय 9 वर्ष )यांचा ञन्म झाला होता व सर्वजण एकत्र कुटुंबात आनंदाने राहत होते आणि या नातवाचा आजी- आजोबांसोबत खुपच जास्त लळा व प्रेम बसला होता व नातु लहानाचा मोठा सुद्धा या आजी-आजोबांकडे झालेला होता व सताता तो त्पांचेकडेच राहत होता आणि आजी – आजोबा व नातू यांचा भावनिक अटॅचमेंट व लळा होता व मध्यंतरी चार वर्षापुर्वी मुलगा कै. मंगेश यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे सुन अवनी ही तीन वर्षांपूर्वी नातू कु. अश्वथ याला घेऊन परस्पर माहेरी निघून गेली व माहेरी गेल्यापासून नातू कु. अश्वथ यास आजी -आजोबा यांच्यापासून मुद्दामपणे लांब ठेवू लागले व त्यांना भेटण्यास मज्जाव करत होती व त्यामुळे नातवाचे विरहामुळे व तसेच सुनेच्या स्वभावामुळे आजी- आजोबा पार खचुन गेले होते व तसेच नातवाला सुद्धा सुनेने चांगल्या प्रकारे सांभाळ करीत नसल्यामुळे व नातू सतत आजारी पडत होता ,त्यामुळे आजी -आजोबा हे नातवास पाहण्यासाठी गेले असता सुद्धा सुनेने नातवास पाहू न देता आजी- आजोबा यांना हाकलून दिले व तसेच सुनेने दुसरे विवाह करण्याच्या तयारीत असल्याच्या समजल्यामुळे आजी-आजोबा हे नातवाचे पालन संस्कार , संगोपन चांगल्या प्रकारे होणेसाठी नातवा चे उज्वल भविष्य घडविण्यासाठी आजी -आजोबा हे नातू कु. अश्वथ वय 9 वर्ष याचा कायमचा ताबा व पालन पोषण ,संगोपन आणि चांगले शिक्षण व उज्जवल करियर करण्यासाठी आजी-आजोबां हे नातवाचे परमनंट कस्टडी मिळण्यासाठी हिंदू गार्डियन अँड वार्डस अँक्ट नुसार परमनंट चाइल्ड कस्टडी साठी अँड. श्रीनीवास कटकुर यांचेमार्फत सोलापुर येथील मे. कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली व याकामी मे. कोर्टाने सुन अवनी यांना कोर्टात हजर राहुन म्हणणे सादर करणेचा आदेश पारीत करणेत आला.
*याकामी आजी-आजोबा यांचे तर्फे अँड. श्रीनीवास कटकुर , अँड. किरण कटकुर व अँड. आकाश आयंची हे काम पाहत आहेत*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!