श्री बालाजी मंदिर ट्रस्ट तळेगावचे ट्रस्टी दिनेशभाई मेहता यांचे अपघाती निधन.
तळेगाव पोलीस ठाण्यात बस चालकावर (एमएच 4 सीडब्ल्यू 4689 ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्री बालाजी मंदिर ट्रस्ट तळेगावचे ट्रस्टी दिनेशभाई मेहता यांचे अपघाती निधन.
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, १९ डिसेंबर.
दिनेशभाई मेहता यांचा अपघात तळेगाव येथील खांडगे पेट्रोलपंपा समोर आज पहाटे पावणे सहाच्या सुमारास घडला. मेहता हे त्यांच्या टीव्हीएस स्कूटी वरून तळेगाव बाजारपेठेकडे जात होते यावेळी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने मेहता यांचे निधन झाले. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात बस चालकावर (एमएच 4 सीडब्ल्यू 4689 ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश मेहता हे श्री बालाजी मंदिर ट्रस्ट तळेगावचे ट्रस्टी गट्टूलाल मेहता यांचे छोटे बंधू व चंद्रकांत मेहता यांचे वडील होते. ते राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे ज्येष्ठ स्वंयसेवक म्हणून ही त्यांची ओळख होती. त्यांच्या आकस्मित निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



