ताज्या घडामोडी

लोकप्रतिनिधींवर दाखल याचिकांच्या संदर्भात विशेष खंडपीठाची स्थापना होणार – न्यायमूर्ती जस्टिन रामन्ना

Spread the love

दिल्ली : लोकप्रतिनिधींवर दाखल असलेल्या याचिकांच्या प्रगतीपर सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन केले जाणार आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जस्टिन रामन्ना यांनी हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

आता खासदार, आमदार यांच्या वरील दाखल याचिकांच्या संदर्भात विशेष खंडपीठ स्थापन होणार आहे. त्यांच्या माध्यमातून खासदार ,आमदार यांच्या विरुद्ध सुनावणी घेत असलेल्या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या आदेशाशिवाय बदली करता येणार नाही. तसेच उच्च न्यायालयाच्या मान्यतेशिवाय कोणतेच राज्य सरकार लोकप्रतिनिधींनी वरील खटले मागे घेऊ शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे लोकप्रतिनिधी कायद्याच्या चौकटीत अडकण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयामुळे राजकीय नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!