ताज्या घडामोडी

अकरावीची सीईटी परिक्षा रद्द; पालक व विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर

Spread the love

मुंबई :अकरावी प्रवेशासाठी अनिवार्य असणारी सीईटी परीक्षा रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द केली. त्यानंतर अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचे जाहीर केले. विद्यार्थ्यांनी सीईटीची तयारी सुरू केली. परंतु अभ्यास आता अंतिम टप्प्यात असताना परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. यामुळे विद्यार्थ्यांवर वर ताण आला आहे. परीक्षेसाठी जीवतोड मेहनत करणारे विद्यार्थी यामुळे हिरमुसले आहेत.यावर्षी १२ लाख विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!