आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 जयंतीनिमित्त बोधिवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने 133 डजन वही व पेन करंजकर विद्यालय, शांताई अनाथ आश्रम,गांधी नगर भागातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप…..!

Spread the love

सोलापूर:- विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 जयंतीनिमित्त बोधिवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने 133 डजन वही व पेन करंजकर विद्यालय, शांताई अनाथ आश्रम. व गांधी नगर भागातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

 बोधिवृक्ष सामाजिक संस्था ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारी संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून वर्षभर वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबविण्याचे काम बोधिवृक्ष सामाजिक संस्था करणार आहे . महापुरुषांची जयंती ही विचारांची जयंती म्हणून साजरी करत असतो असे मत बोधिवृक्ष सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आकाश इंगळे यांनी करंजकर विद्यालय येथे मांडले.

यावेळी उपस्थित संस्थेचे संस्थापक आकाश इंगळे, सिध्दलिंगेश्वर विजापूरे, दिनेश चव्हाण , विकी ठेंगले उपस्थित होते.करंजकर विद्यालयाचे मुख्याध्यापिका राजश्री तडकसे सचिव श्रीमती धानमा मधली, सदस्य अजय मधली यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम चे सूत्रसंचालन सौ श्रीदेवी येळमेली यांनी केले तर आभार श्री लक्ष्मण पवार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!