ताज्या घडामोडी

साप्ताहिक अंबरचे संस्थापक व संपादक सुरेश साखवळकर यांचा वाढदिवस साजरा

Spread the love

तळेगाव : शहरातील साप्ताहिक अंबरचे संस्थापक व संपादक, गायक ,अभिनेते सुरेश साखवळकर यांचा जन्मदिवस विविध कार्यक्रमातून साजरा करण्यात आला.मराठी साहित्य परिषद तळेगाव शाखेच्या वतीने चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

सुरेश साखवळकर यांना आवाज न्यूजचे संपादक गोपाळ परदेशी, नगरसेवक निखिल भगत, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी निरंजन जहागीरदार, संविद पाटील, शैलेंद्र साळुंके उपस्थित होते.

सुरेश साखवळकर तळेगाव परिसरातील कला क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत असून गेली अनेक वर्षे साप्ताहिक अंबर यशस्वीपणे संपादित करीत आहेत. हाडाचा पत्रकार, गायक,अभिनेता अशी त्यांची ओळख आहे. बालगंधर्व संगीत मंडळाचे ते अध्यक्ष असून वानप्रस्थाश्रमचे मुख्य विश्वस्त म्हणून कार्यरत आहे. रूडसेट या संस्थेवर सल्लागार या पदावर ते कार्यरत आहेत.

पत्रकारिते बरोबरच संगीत हा त्यांचा आवडीचा विषय असून कोरोनाचे संकट या विश्वातून लवकरात लवकर संपवावे व पुन्हा कलाक्षेत्र कलाकारांनी भरून जावे अशी अपेक्षा जन्मदिनी साखवळकर यांनी व्यक्त केली आहे.

सुरेश साखवळकर यांचे जन्मदिनी अभिष्टचिंतन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!