ताज्या घडामोडी

गुटका बहाद्दरांना आवरणार कोण?

पुणे जिल्ह्यात गुटखा बंदी असतानादेखील,गावापासून,  तालुक्यात, जिल्ह्यात, गुटखा येतो कुठुन?

Spread the love

गुटका बहाद्दरांना आवरणार कोण?

आवाज न्यूज: पुणे जिल्ह्यात गुटखा बंदी असतानादेखील,गावापासून,  तालुक्यात, जिल्ह्यात, गुटखा येतो कुठुन?

परिसरात गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रमाण वाढत आहे. गुटखा खाणारे चारचाकी, दुचाकी, बस, रिक्षा आदी वाहनांमधून बिनधास्त खाली थुंकतात.

कोणाच्या अंगावर जाईल याचेही अनेकजणांना  भान नसते. अनेक जण रस्ता थुंकण्यासाठीच आहे असे समजून रस्त्यावर सडा टाकल्यासारखे चालता चालता थुंकतात. एसटीबस स्थानक, शहर बस थांबा, रेल्वे स्टेशनच्या परिसरात राजरोस असे प्रकार चालतात. अनेक कार्यालयाच्या परिसरात  जीन्यात बिनधास्त थुंकतात . यामुळे परिसर अस्वच्छ, दुषीत तर होतोच पण साथीचे आजारही फैलावण्याची शक्यता आहे.

राज्यात गुटखा बंदी असताना यांना गुटखा मिळतोच कसा याबाबत प्रशासनाने दखल घेवून सार्वजनिक ठिकाणी थुकणाऱ्यांना आळा घालणे आवश्यक आहे. व गुटखा शहरात येणार नाही याबाबत ठोस कारवाई करावी. अशी नागरिकांकडून मागणी होत आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!