ताज्या घडामोडी

सिंहांनाही कोरोनाची बाधा, चेन्नईत प्राणिसंग्रहालयातील 9 सिंहांना लागण..!

Spread the love

आवाज न्यूज : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर गेली असताना, कोरोनाने आता प्राण्यांनाही आपल्या कवेत घेण्यास सुरवात केली आहे. जंगलचा राजाच कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे.

चेन्नईजवळ वंडलूर अरिग्नार अण्णा प्राणिसंग्रहालयातील 9 वर्षांच्या ‘निला’ नावाच्या सिंहिणीचा 3 जून रोजी मृत्यू झाला. त्याआधी एक दिवसापूर्वीच तिच्या नाकातून स्त्राव येत असल्याचे सांगण्यात आले. प्राणिसंग्रहालयातील 11 पैकी 9 सिंहांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (बरेली) आणि सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (हैदराबाद) येथे सिंहाचे रिपोर्ट पडताळणीसाठी पाठविले आहेत. सध्या सर्व सिंहांना निरीक्षणाखाली ठेवले आहे. या सिंहामध्ये 26 मे रोजी कोरोनाची लक्षणे दिसून आली होती.

प्राणिसंग्रहालयातील ‘एनिमल हाउस-1’ मध्ये ठेवलेल्या 5 सिंहांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसली. तमिळनाडू पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठात सिंहांच्या रक्ताचे नमुने पाठविण्यात आले. प्राणिसंग्रहालयातील सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली गेली आहे.

हैदराबादेतील ‘नेहरू जूलॉजिकल पार्क’मधील 8 आशियाई सिंहांनाही कोरोनाची लागण झाल्याचे यापूर्वी समोर आले होते. उत्तर प्रदेशच्या इटावामधील लायन सफारी पार्कमधील दोन सिंहिणी पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!