ताज्या घडामोडी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सहा गाड्यांच्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू

Spread the love

खंडाळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या लेन वर खंडाळा घाटातील किलोमीटर 40 येथे झाला.

दोन कार, दोन कंटेनर, टेम्पो व ट्रक अशा सहा वाहनांचा समावेश असलेल्या या अपघातात एका कारचा दोन मोठ्या वाहनांमध्ये अडकून चक्काचूर झाल्याने कार मधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात आठ जण जखमी झाले असून तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.तर पाच जण किरकोळ जखमी आहेत. पुढील उपचारासाठी जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती समजताच आरबीआय देवदूत यंत्रणा लोकमान्यची यंत्रणा अपघातग्रस्तांच्या मदतीला सामाजिक संस्थांची पथके बोरघाट व खोपोली पोलीस यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेत मयत व जखमींना वाहनातून बाहेर काढले. सर्व वाहने बाहेर काढल्याने मोठ्या प्रमाणात झालेली वाहतूक कोंडी पूर्वपदावर येत असून वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती मदतीसाठी आलेल्या मृत्युंजय टीम मधील गुरुनाथ साठेलकर यांनी दिली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!