ताज्या घडामोडी

बैलपोळा सणानिमित्त मातीच्या आकर्षक बैलजोड्या बाजारात दाखल

Spread the love

लोणावळा : भाद्रपद महिन्यातील बैलपोळा सणानिमित्त लोणावळा बाजारपेठ विविध आकर्षक व लहान,मोठ्या आकारातील सुबक मातीच्या बैलजोड्यांनी फुलली आहे.

शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पोळा साजरा केला जातो. या सणासाठी शहरातील बाजारपेठेत मातीच्या बैलजोड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

ग्रामीण संस्कृतीचे प्रतिक असणा-या बैलांना सजवून व पूजा करून ग्रामीण भागात त्यांची मिरवणूक काढली जाते. शहरी भागात बैल हा प्राणी नामशेष झाल्यामुळे या मातीच्या बैल जोड्यांना पसंती दिली जाते. शहरातील बालगोपाळांना ग्रामीण संस्कृतीचे दर्शन व्हावे यासाठी या बैलजोड्या खरेदी करण्यावर शहरी भागातील नागरिक भर देतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!