आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे २८ डिसेंबरला “है तैयार हम” महारॅलीस हजारो कार्यकर्ते जाणार *सुरेश यादव*

Spread the love

अक्कलकोट (प्रतिनिधी) राजशेखर पवार दि 21 सविस्तर बातमी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आपल्या गौरवशाली इतिहासाची १३८ वर्ष पूर्ण केली आहेत.अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  खा.श्री. मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली दि. २८ डिसेंबर २०२३ रोजी काँग्रेस पक्ष १३९ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

दि.२८ डिसेंबर २०२३ रोजी १३९ वा काँग्रेस स्थापना दिन राष्ट्रीय स्तरावर मोठ्या उत्साहात साजरा करण्याबाबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने निर्णय घेतला असून नागपूर येथे राष्ट्रस्तरीय “है तैयार हम” महासंमेलन महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने या ऐतिहासिक महासंमेलन महारॅलीच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला दिली असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी साठी आनंदाची बाब आहे.या महारॅलीला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.  मल्लिकार्जून खरगे,काँग्रेस नेत्या काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा,खा.श्रीमती सोनियाजी गांधी,काँग्रेस  खा.राहुल गांधी,.श्रीमती प्रियांका गांधी,देशातील काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते व राष्ट्रीय पदाधिकारी हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
प्रांताध्यक्ष .नानाभाऊ पटोले  यांच्या मार्गदरशनाखाली महारॅलीसंदर्भात सर्व वरिष्ठ नेते,प्रदेश,जिल्हा पदाधिकारी,आघाडी,युवक, संघटना, सेल व विभाग यांचे पदाधिकारी,सक्रिय कार्यकर्ते “है तैयार हम” महारॅली नियोजन करत आहेत.
राज्यातून नागपूर येथे १० लक्ष कार्यकर्त्यांच्या उपस्थितीचे नियोजन करण्यात आले आहे. दि.२८ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथे दुपारी १.३० वा.होणाऱ्या राष्ट्रस्तरीय “है तैयार हम” या महारॅलीला राज्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.”है तैयार हम” महारॅली करिता विज्ञान तंत्रज्ञान कौशल्य विकास विभाग चे कार्यकर्ते मोठया संख्येने महासंमेलन महारॅलीला हजर राहणार आहेत.काँग्रेस प्रेमी नागरिकांनी महासमेलन कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आव्हान *एसटीएस प्रदेश प्रमुख सुरेश यादव* यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी या नंबरवर 9130005177  संपर्क साधावा असे आवाहन  प्रदेश प्रमुख सुरेश यादव यांनी केले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!