ताज्या घडामोडी

शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माळवाडीत नेत्रतपासणी शिबिर

Spread the love

वडगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माळवाडी येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

मावळ तालुका राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष सुनील भोंगाडे यांच्या पुढाकाराने व पार्वती नेत्रालय यांच्या सहकार्याने आयोजित माळवाडी येथील या शिबिरात ७०० जणांनी सहभाग घेतला. शिबिरांमध्ये १०० जणांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. ४०० जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन आमदार सुनील शेळके, बापूसाहेब भेगडे, जिल्हा परिषद सभापती बाबुराव वायकर, विठ्ठलराव शिंदे, सुभाष जाधव, नारायण ठाकर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी नगरसेवक किशोर भेगडे, गणेश काकडे, प्रशांत भागवत, गणेश खांडगे,संतोष भेगडे ,कैलास गायकवाड, देवा गायकवाड, माळवाडीच्या सरपंच पूजा आल्हाट आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!