ताज्या घडामोडी

कामशेत ,उड्डाणपूल ठरत आहे अपघात चे केंद्र..

कामशेत येथील    पुलावर पुण्याकडे जाणाऱ्या बाजुला, मोठे खड्डे पडले असून वाहन चालवणे अवघड झाले आहे.

Spread the love

कामशेत ,उड्डाणपूल ठरत आहे अपघात चे केंद्र..

आवाज न्यूजः शिवानंद कांबळे,कामशेत प्रतिनिधी, 18ऑगष्ट

कामशेत येतील  मुंबई -पुणे महामार्गावर कामशेत येथील    पुलावर पुण्याकडे जाणाऱ्या बाजुला, मोठे खड्डे पडले असून वाहन चालवणे अवघड झाले आहे.

या खड्ड्यांमुळे आतापर्यंत 10 ते 15 छोटे मोठे अपघात झाले असून, काही अपघाता मध्ये वाहन चालक गंभीर जखमी झाले. तरीसुद्धा रस्ता  प्रशासनाला जाग आली नाही.अनेक नागरिकाने तक्रारी करून सुद्धा कुठली ही उपाययोजना यावर  करण्यात आली नसल्याने, वाहनचालकांने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा ब्रीज तयार होण्यास ५ वर्षं लागली होती, शिवाय हा रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे अशी नागरिकांचे म्हणणे आहे, हा ब्रीज सुरू होऊन अजून एक वर्ष ही पुर्ण झाले नाही तरी खड्डे पडले आहेत.

हे खड्डे पडून अनेक दिवस झाले असून अजून किती अपघात होण्याची वाट रस्ते प्रशासन पाहणार आहे असे नागरिक विचारणा करित आहेत. अनेक दुचाकी चालक या ठिकाणी  अपघात होऊन जखमी झाले आहे तीव्र उतार असल्याने पुण्या कडे जाणारी वाहने मोठया प्रमाणात वेगाने येत असल्याने,  अनेक वाहने खड्डे पाहून ब्रेक मारत असल्याने वाहने एकमेकांवर आदळून अपघात होत आहेत. अनेक वाहनांचे नुकसान होऊन नागरिकाना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी यावर लवकरात लवकर उपाययोजना करावा अशी मागणी वाहन चालक करत आहे ..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!