आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डी.राम रेड्डी यांच्या कठोर कार्याचा सोलापूरच्या तरुणांनी घ्यावा आदर्श – सोलापूर विकास मंच*

डी.राम रेड्डी यांना पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर झाल्या बद्दल सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आले अभिनंदन_

Spread the love

सोलापूर:- पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाच्या वतीने बालाजी अमाईंन्सचे व्यवस्थापकीय संचालक डि.राम रेड्डी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांच्या विस्तृत अनुभवाचा आणि अपार मेहनतीचा गौरव सोलापूरकरांच्या वतीने सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रात सर्व गोळ्या औषधात वापर होणार्‍या ए.पी.आय. क्षेत्रातील त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक तरुण उद्योजकांना प्रेरणा मिळाली आहे.

कोरोना काळात संपूर्ण जगातील लसीं मध्ये वापर होणार्‍या ए.पी.आय.साठी बालाजी अमाईंन्स यांनी तत्परतेने पुरवठा करुन अनेकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडवुन आणला, ह्यात डि.राम रेड्डी यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या यशस्वी प्रवासातून आणि योगदानातून युवकांना नक्कीच प्रेरणा मिळेल असा विश्वास सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी व्यक्त केला. त्यांचा जीवनगौरव पुरस्कार हा त्यांच्याप्रती आदर आणि सन्मान व्यक्त करणारा आहे, आणि त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सोलापूरकरांच्या वतीने डि.राम रेड्डी यांना सोलापूर विकास मंचच्या वतीने शुभेच्छा शुभेच्छा देण्यात आल्या. ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा, अॅड. दत्तात्रय अंबुरे, विजय कुंदन जाधव आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!