ताज्या घडामोडी

या सहस्ञचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त आपल्याला भेटण्याचा योग आला हे भाग्य समजतो – खासदार छञपती संभाजीराजे भोसले

Spread the love

लोणावळा  : अंजनाबाई शिवराम भसे व शिवराम नामदेव भसे सहस्ञचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त आपल्याला भेटण्याचा योग आला हे भाग्यवान समजतो . मुंबईला आझाद मैदानावर मराठा आरक्षण मिळावे , या मागणीसाठी मी आमरण उपोषणाला बसलो , पण आम्ही उपवासाची सवय नसल्याने कासावीस झालो होतो , किती दिवस असे काढावे लागणार असा प्रश्न निर्माण झाला. मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळांच्या वतीने आझाद मैदानावर भेटायला आलेल्या व पंधरा वीस मिनिटे भजन ऐकल्यावर चैतन्य परत आले.बरे वाटले.शुगर कमी झाली . मी मग परवानगी देताच दोन तास भजन आपण केलेत. वारकरी साःप्रदायाची शिस्त पाहून व तो माहौल तयार झाल्याने , मंञीमंडळात चर्चा चालू होती. आणि काही वेळात मंञालयातून मागण्या मान्य झाल्याचा निरोप आला.उपोषण मागे घेतले..छञपतींचे काळातही जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी मोलाचे मार्गदर्शन केल्याने त्यांना हिंदवी स्वराज्याची स्थापना व रक्षण करता आली,असे खासदार छञपती संभाजीराजे भोसले सत्कार सोहळ्यानिमित्त भाषणातून म्हणाले.

भंडारा डोंगरावर वारकरी म्हणून चार तपे सेवा करणारे मंगळूर येथील ह.भ.प.शिवरामदादा नामदेव भसे व सौ.अंजनाबाई शिवराम भसे यांचे सहस्ञचंद्रदर्शन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार छञपती संभाजीराजे भोसले यांचे हस्ते मानपञ , शाल , पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देवून भसे दांपत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरून ते बोलत होते.

यावेळी मावळचे माजी राज्यमंञी संजय तथा बाळा भेगडे , माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे , तसेच भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब तथा साहेबराव काशिद, किसान संघाचे अध्यक्ष शंकरराव शेलार , जेष्ट कीर्तनकार चंद्रकांत महाराज वांजळे , गुरूवर्य स्वामी निरजानंद सरस्वती (परमहंस ) , भक्तिनिष्ठ शंकरमहाराज मराठे ,भाजपचे तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर , मावळरत्न पुरस्काराचे मानकरी उद्योजक रामदासजी काकडे , वारकरी सौ.अंजनाबाई शिवराम भसे व ह.भ.प.शिवरामदादा भसे आदी उपस्थित होते. राजस्थान येथील वारकरी सांप्रदाय चे प्रदेशाध्यक्ष श्रीमंत रमेशचंद्रजी व्यास यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्री .रमेशचंद्रजी व्यास यांनीही छञपती संभाजीराजे यांचे कार्याचे कौतुक केले. तसेच भसे परिवाराच्या प्रेमापोटी छञपतींचे १३ वे वंशज सत्काराला आले आहेत.. यावेळी श्रीमंत छञपती संभाजीराजे भोसले यांचा तुकोबांची पगडी घालून , शाल , श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि तलवार तसेच भक्ती शक्तीचे शिल्प देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मावळरत्न पुरस्कार माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे , जेष्ठ उद्योजक रामदासजी काकडे , क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी केलेल्या कु.अपूर्वा शिंदे , यांचा स्मृतिचिन्ह , शाल , पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मानपञ वाचन जेष्ट पञकार विलास भेगडे यांनी केले. प्रास्ताविक व स्वागताचे भाषणात मावळ तालुका वारकरी सांप्रदाय संस्थापक अध्यक्ष नंदकुमार भसे यांनी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी व छञपतींचे तेरावे वंशज छञपती संभाजीराजे भोसले , आणि उद्योजक श्रीमंत रमेशचंद्रजी व्यास यांचे आभार मानले..त्यांना यावेळी श्रावणबाळ पुरस्कार देवून छञपतींचे व निरजानंद सरस्वती यांचे हस्ते गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे संयोजन मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळ संस्थापक नंदकुमार भसे , माजी सरपंच नामदेव भसे , सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती भसे व शिवतेज प्रतिष्ठानचे आध्यक्ष तानाजी भसे यांनी व मावळ तालुका सांप्रदाय मावळ यांचेतर्फे करण्यात आले.

यावेळी जेष्ट कीर्तनकार चंद्रकांत महाराज वांजळे यांनी ” अमृताची फळे अमृताची वेली , तेचि पुढे चाली बिजाचिया ! ! या संत तुकाराम महाराज यांचे अभंगावर आजचे सहस्ञचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त कीर्तन झाले.. यात महाराज म्हणाले कुळी कन्या पुञ , होतील सात्त्विक । तयाचा हारिक वाटे देवा. असे भसे कुटूंब आहे.. सुखी घरांचे उदाहरण देत महाराज म्हणाले, पती समजदार असेल तर मकान होते. पत्नी समजदार असेल तर घर होते , मुले समजदार आसेल ;तर स्वर्ग होतो आणि मुली समजदार असेल;तर स्वर्गाहून सुंदर घर होते.

या कार्यक्रमाला माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर , आमदार सुनिलआण्णा शेळके , पोटोबा देवस्थानचे अध्यक्ष सोपानराव म्हाळसकर , राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे , नारायण ठाकर , तसेच शांताराम कदम , आदी शेकडो मान्यवर तसेच वारकरी, गायक प्रविणमहाराज केदारी , अरूण महाराज येवले , तसेच मावळ तालुका वारकरी सांप्रदाय आरोग्य समिती अध्यक्ष सुनिल वरघडे , सचिव रामदास पडवळ, नाणेमावळ तालुकाध्यक्ष मंगेश ढोरे , तसेच , वारकरी मंडळ तालुकाध्यक्ष , तीनही मावळचे विभागप्रमुख , ग्रामप्रतिनिधी , आदी तसेच भाऊसाहेब ढोरे , उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!