प्रसिद्ध सिनेअभिनेञी अरूणा इराणी यांचे हस्ते व्हीपीएस प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी , मुख्याध्यापिका , शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला..
विद्यार्थीनींनी चांगले मनापासून अभ्यास करा , यश मिळवा व खूप खूप मोठे व्हा, देशाचे नाव , शाळेचे , आईवडिलांचे नाव उज्वल करा.सिनेअभिनेञी अरूणा इराणी..
प्रसिद्ध सिनेअभिनेञी अरूणा इराणी यांचे हस्ते व्हीपीएस प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी , मुख्याध्यापिका , शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला..
आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी २७ डिसेंबर.

प्रसिद्ध सिनेअभिनेञी अरूणा इराणी यांचे हस्ते व्हीपीएस प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थी , मुख्याध्यापिका , शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते सुमारे दीडशे पुरस्काराचे मानकरी धिरूभाई कल्याणजी , उद्योजक गिरीश पारख , पालक संघाचे पदाधिकारी राजू खांडेभरड , माणिक मोकाशी , शाळा समितीचे पदाधिकारी व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अरविंदभाई मेहता तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते..मुख्याध्यापिका.जाधव आणि शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते…

यावेळी उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल धिरूभाई टेलर ( कल्याणजी ) यांचा तसेच मुख्याध्यापिका.जाधव तसेच शिपाई भिवाजी गायखे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार केला..यावेळी देशभक्तीपर गीते , कोळीगीते , महाराष्ट्र राज्याची संस्कृती सांगणारी नृत्य व गीते पहिली ते चौथीचे विद्यार्थीनी , विद्यार्थ्यांच्या वतीने सादर करण्यात आली..
प्रमुख पाहुण्या अरूणा इराणी यांनी भाषणात विद्यार्थी , विद्यार्थीनींनी चांगले मनापासून अभ्यास करा , यश मिळवा व खूप खूप मोठे व्हा, देशाचे नाव , शाळेचे , आईवडिलांचे नाव उज्वल करा , असा संदेश दिला.



