ताज्या घडामोडी

महाराष्ट्रात आजपासून ‘मिशन कवच कुंडल’

Spread the love

मुंबई : महाराष्ट्रात आजपासून (8 ऑक्टोबर) मिशन कवच कुंडल योजना राबविली जाणार आहे.

राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांचे कोविड लसीकरण करण्याच्या दृष्टीने राज्यामधील महाविकास आघाडी सरकारने सात दिवसांच्या मिशन कवच-कुंडल कार्यक्रमाची घोषणा केली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली.

राज्यात 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर असे सात दिवस हा कार्यक्रम राबवण्यात येईल. त्या अंतर्गत दररोज किमान 15 लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल असे टोपे म्हणाले.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अजून टळलेला नाही त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी उपाययोजना करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची घोषणा केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!