ताज्या घडामोडी

गुरुपोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर, अक्कलकोट अन्नछञ मंङळ ट्रस्ट, तयारी अंतिम टप्प्यातः- अमोलराजे भोसले.

कार्यक्रमासाठी जगभरातून प्रतिष्ठित मान्यवर अक्कलकोट च्या पावन नगरीत होणार दाखल....

Spread the love

अक्कलकोट अन्नछञ मंङळ ट्रस्ट तयारी अंतिम टप्प्यात

आवाज न्यूज :अक्कलकोट llयेथे श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंङळ ट्रस्ट चा ३५ वा वर्धापन दिन आणि गुरुपोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट अन्नछञ मंङळाकङून विविध भरगच्च सामाजिक उपक्रमांचे विशेष आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी जगभरातून प्रतिष्ठित मान्यवर अक्कलकोट च्या पावन नगरीत दाखल होणार असून यासाठी भव्य-दिव्य
सभा मंङप उभारण्यात आला असून हा सभा मंङप लक्षवेधक आकर्षण ठरतोय.

मागील दोन वर्ष  कोरोनाचा काळ गेल्याने गुरुपौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी करता आली नाही,  त्यामुळे यावर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त 35 वा वर्धापन दिन साजरा करण्याचे अन्नछत्र मंडळाकडून ठरवण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी लाखो भक्त-भाविक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून त्याप्रमाणे अन्नछञ मंङळाकङुन भक्त-भाविकांच्या आगमनासाठीची पूर्व तयारी पूर्ण झाल्याचे अन्नछञ मंङळ ट्रस्टचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी ,आवाज न्यूज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!