ताज्या घडामोडी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची किवळे येथील सिंबायोसिस विद्यापीठास भेट

Spread the love

पुणे : येथील किवळेमध्ये असणाऱ्या सिंबायोसिस कौशल्य व व्यवसायिक विद्यापीठात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भेट दिली.

या भेटीदरम्यान त्यांनी विद्यापीठाच्या आवारामध्ये असणाऱ्या व्यवसायिक भागीदारांनी उभ्या केलेल्या रिटेल, ब्युटी वेलनेस आणि अभियांत्रिकी विभागाच्या कौशल्यशिक्षण प्रयोगशाळांची पाहणी केली. येथील जागतिक दर्जाच्या सुविधा पाहून ते प्रभावित झाले.यावेळी राज्यपालांनी दरवर्षी होणाऱ्या 100 टक्के इंटर्नशिप व प्लेसमेंटच्या यशाबद्दल विद्यापीठाची प्रशंसा केली. तसेच covid-19 सारख्या जागतिक महामारीच्या आव्हानात्मक काळातही विद्यापीठाने राखलेल्या यशाबद्दल विशेष समाधान व्यक्त केले.

यावेळी राज्यपालांनी कुलपतींच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. तसेच प्र- कुलपती डॉ.स्वाती मुजूमदार, विभाग प्रमुख, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधत त्यांची प्रशंसा केली.

या विद्यापीठांमध्ये तीन हजार पेक्षा जास्त विद्यार्थी अभियांत्रिकी व्यवस्थापन डेटा सायन्स, स्थापत्य, ब्युटी वेलनेस या सारख्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत. कंपनीत जाऊन करायची वार्षिक इंटरंशिप या प्रत्येक अभ्यासक्रमाचा एक अविभाज्य घटक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!