ताज्या घडामोडी

आमदार निलेश लंके यांची तळेगाव दाभाडे येथील सहकारी अभिजित सोनवणे यांच्या घरी सांत्वन भेट

Spread the love

तळेगाव दाभाडे : येथील युवा कार्यकर्ते अभिजित संजय सोनवणे यांच्या मातोश्री दिवंगत संध्या संजय सोनवणे यांचे दि.०३ सप्टेंबर २१ रोजी आकस्मिक निधन झाले.सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर निलेशजी लंके व निलेश लंके प्रतिष्ठान युवक अध्यक्ष विजुभाऊ औटी व त्यांचे सहकारी यांनी सोनवणे कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेऊन सांत्वन केलं.

संध्या सोनवणे ह्या कामगार नेते व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तळेगाव शहर अध्यक्ष दिवंगत संजय सोनवणे यांच्या पत्नी होत्या व तळेगाव येथील जनरल हाॅस्पिटल येथे आरोग्य विभागात जेष्ठ कर्मचारी म्हणून कार्यरित होत्या.

दरम्यान निलेशजी लंके यांचा मनाचा मोठेपणा या प्रसंगी पाहायला मिळाला या कठीण प्रसंगी आमदार निलेश लंके सारखा नेता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे पाहिल्यानंतर अभिजित सोनवणे कुटुंबियांना अश्रू अनावर झाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!