माजी नगरसेविका श्रीमती अनिता करण म्हेत्रे यांची सोलापुर शहर महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड….!

सोलापूर:-माजी नगरसेविका श्रीमती अनिता करण म्हेत्रे यांची सोलापुर शहर महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून त्यांचे निवडीचे पत्र आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

. बुगप्पा म्हेत्रे यांची उपाध्यक्षपदी निवड, व विश्वनाथ म्हेत्रे यांची सोलापुर शहर काँग्रेस बांधकाम कामगार विभागाच्या अध्यक्षपदी निवड, आणि कै. करण अण्णा म्हेत्रे यांच्या अनेक समर्थकांचेही काँग्रेस पदाधिकारी म्हणून निवड त्यांचेही निवडीचे पत्र आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते प्रदान*
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, यांचे निष्ठावंत कै. करण अण्णा म्हेत्रे यांची धर्मपत्नी माजी नगरसेविका श्रीमती अनिता करण म्हेत्रे यांची सोलापुर शहर महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्यांचे निवडीचे पत्र आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतन नरोटे, महिला अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

तसेच कै. करण अण्णा म्हेत्रे यांचे बंधु मा. बुगप्पा म्हेत्रे यांची उपाध्यक्षपदी निवड, व विश्वनाथ म्हेत्रे यांची सोलापुर शहर काँग्रेस बांधकाम कामगार विभागाच्या अध्यक्षपदी निवड, आणि कै. करण अण्णा म्हेत्रे यांच्या अनेक समर्थकांचेही काँग्रेस पदाधिकारी म्हणून निवड त्यांचेही निवडीचे पत्र आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते, सोलापुर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे, महिला अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
तसेच यावेळी कै. करण अण्णा म्हेत्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, आज अनिताताई म्हेत्रे यांचे महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी, तसेच बुगप्पा म्हेत्रे, विश्वनाथ म्हेत्रे आणि कै. करणअण्णा यांच्या समर्थकांचे पदाधिकारी म्हणून निवड झाली यासर्वांचे अभिनंदन, आज करण अण्णाची आठवण येत आहे. करण अण्णा हे शिंदे साहेबांचे एकनिष्ठ होते. त्यांच्या रक्तात काँग्रेस पक्ष होता. अनेक निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी जिवाचे रान केले. आयुष्याच्या शेवटपर्यंत समाजाच्या हितासाठी काम केले. लष्कर भागातील समाजबांधव काँग्रेस पक्षावर प्रेम करणारी असून , डॉ बाबासाहेब आंबेडकर, बाबू जगजीवनराम व इतर महापुरुषांच्या विचारावर चालणारा आहे. काँग्रेस पक्ष हा तळागाळातील बांधकाम कामगार, कचरा वेचणाऱ्या, विटभट्टी कामगार, घरेलू कामगार, विडी यंत्रमाग कामगारांचा पक्ष, गोरगरीबांचा आवाज म्हणून काँग्रेस पक्ष काम करत असतो. आपण सर्वजण कैं. करण अण्णा म्हेत्रे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करू या. यावेळी अनिताताई म्हेत्रे म्हणाले की, करण अण्णा हे एक ताकद होते. समाजाचे संघटन चांगल्या प्रकारे केले होते. चुकीच्या गोष्टिवर प्रहार केले. पण ते अकाली गेले आपण सर्वजण पोरके झालो. आपला वाली गेल्यासारखे वाटत आहे. पण मा. सुशीलकुमार शिंदे , आमदार प्रणितीताई शिंदे आपल्या पाठिमागे खंबीरपणे उभे आहेत आपले काही अड़चण असेल तर त्यांना सांगुन दूर करून घेऊ आत्ता आपले पाठीराखे सुशीलकुमार शिंदे आणि प्रणितीताई हेच आहेत. अनेक जण येतात आणि जातात पण आपण सर्व समाजबांधव शिंदे साहेबांच्या काँग्रेसच्या पाठिमागे खंबीरपणे राहून समाजाचे, कामगारांचे काम करून घेऊ, युवकांचे कामे करून घेऊ, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान करण अण्णा होते पण करण अण्णा चे प्रेरणास्थान सुशीलकुमार शिंदे होते. म्हणून आपण सर्व जण शिंदे आणि प्रणितीताई शिंदे यांच्यासोबत राहून त्यांना खंबीर साथ द्यावे असे आवाहन केले.
यावेळी प्रणितीताई शिंदे, शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेविका नूतन महिला कार्याध्यक्षा अनिताताई म्हेत्रे, बुगप्पा म्हेत्रे, विश्वनाथ म्हेत्रे, सुमन जाधव, मध्य युवक अध्यक्ष वाहिद बीजापुरे, हेमाताई चिंचोळकर, दीपक फुले, वाबलेश भंडारे, नरसिंग दिड्डी, सिद्राम म्हेत्रे, बाबू भंडारे, विजय म्हेत्रे, आकाश आप्पेपागोलु, प्रकाश पल्लोलु, विष्णु पल्लोलु, व्यंकटेश चन्नपागोलु, वाबलेश कुमार, राहुल तल्लारे, प्रकाश बाजरे, ओंकार नवले, सुनीता हुल्लेनवरु, रेश्मा म्हेत्रे यांच्यासह लष्कर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिरुपती परकीपंडला तर आभार नागनाथ शावने यांनी मानले.



