ताज्या घडामोडी

धक्कादायक! निवडणूक आयोगाची वेबसाईट हॅक; हजारो बनावट वोटिंग कार्ड बनवले

Spread the love

दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाची वेबसाइट हॅक करून हजारो बनावट वोटिंग कार्ड बनवण्याचे धक्कादायक माहिती समोर आले असून याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एकाला अटक केली आहे.

वेबसाईट वरील तांत्रिक दुवे हेरत हॅकरने वेबसाईट हॅक करत हजारो वोटिंग कार्ड तयार केली. याचा  वापर राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांना आगामी काळातील निवडणुकांसाठी कार्ड विकून करण्यात येणार होता.

या प्रकरणाचा सुगावा पोलिसांच्या सायबर सेलला लागला .त्वरित हालचाल करत पोलिसांनी निवडणूक आयोगाला याबाबत सतर्क केले नंतर तांत्रिक तपास करत हॅकरला सहारनपुर येथून अटक केली या प्रकरणातील अन्य साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

देशातील उत्तर प्रदेश राज्याच्या निवडणूका आगामी काळात होणार आहे. या पार्श्वभूमीवर व्होटिंग कार्ड घोटाळा उघड झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!